Monday, 18 August 2014

२५. धूप दीप झाला आता कापूर आरती

धूप दीप झाला आता कापूर  आरती  | देवा कापूर आरती  ॥रत्नजडित सिंहासनी     भगवंता मूर्ती  ॥ धृ ॥कर्पूरासम निर्मल माझे मानस राहू दे  ॥देवा मानस राहू दे  ॥कर्पूरासम भावभक्तीचा     सुगंध वाहू दे  ॥  धूप दीप...कापुराची लावून ज्योती पाहीन तव मूर्ती  ॥देवा पाहीन तव मूर्ती  ॥नयनी साठवू     ही भगवंत मूर्ती  ॥ २ ॥  धूप दीप...ज्ञान कळेना ध्यान कळेना  |  कळेना काही  ॥देवा कळेना काही  ॥शब्दरूपी गुंफूनी माळा   ,  वाहतसे पायी  ॥ ३ ॥ धूप दीप...नेत्री ध्यान मुखी नाम, हृदयी तव मूर्ती  ॥देवा हृदयी तव मूर्ती  ॥भावभक्तीने केली देवा,  कापूर आरती  ॥ ४ ॥  धूप दीप...  ...

२४. कापराची ज्योत देवा ओवाळू तुजला

कापराची ज्योत देवा ओवाळू तुजला     ॥ देहंभावे अहंभाव चरणी वाहिला  ॥ धृ ॥ नामस्मरणे मात्र देवा कृपा मज केली     ॥ भक्ता वर द्याया,  मूर्ती प्रसन्न जाहली  ॥ १ ॥ कापराची ज्योत... दया क्षमा शांती देवा उजळल्या ज्योती     ॥ स्वयंप्रकाशित पाहिली भगवंत मूर्ती  ॥ २ ॥ कापराची ज्योत... आनंदाने भावे कापूर आरती केली, हो देवा आरती केली  ॥ नित्यानंदे सगुण स्वामीच्या परमानंदे सगुण स्वामीच्या चरणी वाहिली  ॥ ३ ॥ कापराची ज्योत...  ...

२३. अक्कलकोटनिवासी श्रीस्वामीसमर्था

अक्कलकोटनिवासी श्रीस्वामीसमर्थाजय जय गुरुअवतारा पदीं ठेवी माथा  ॥नृसिंहसरस्वती अवतारा संपविलेकर्दळीवनात जाऊनि तपाचरण केलेनवरूपां धारण करूनि प्रगट पुन्हा झालेनाना नामे घेऊनि देशभ्रमण केले  ॥ १ ॥  अक्कलकोट  ॥योगसिद्धिप्रभावे लीला तू करिसीधर्मा संरक्षूनि जनांसी उद्धरसीवाटे ब्रह्म प्रगटले या भूमिवरती  |दर्शन घेता मिळते चिरसुख मनःशांती  ॥ २ ॥ अक्कलकोट ॥आर्त भाविक साधक तुजसी शरण येतामार्गदर्शन करूनि होसी त्या त्रातासर्वांभूती ईश्वर बघण्या शिकविलाअनन्यभक्तां रक्षिसी आश्‍वासन देता  ॥ ३ ॥परब्रह्म गुरुदेवा कृपा करी आताशरण तुजसी आलो तारी अनाथाभुक्ति-मुक्ति  सद्गती  देई भगवंतागुरुराया अवधूता अवतारी दत्ता  ॥ ४ ...

२२. धन्य धन्य हो प्रदक्षिणा

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची  |झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची  २  ॥ धृ ॥पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी  |सर्वही तीर्थे घडली आम्हां आदिकरूनि काशी  ॥धन्य धन्य हो...मृदंग टाळ ढोल भक्त भावार्थ गाती  |नामसंकीर्तनें ब्रह्मानंदे नाचती  ॥ २ ॥ धन्य धन्य हो...कोटी ब्रह्महत्या हरिती करिता दंडवत  |लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायांत  ॥ ३ ॥धन्य धन्य हो...गुरुभजनाचा महिमा न कळे आगमनिगमांसी  |अनुभव ते जाणती जे गुरुपदिचे रहिवासी  ॥ ४ ॥धन्य धन्य हो...प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिला  |श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला  ॥ ५ ॥धन्य धन्य हो.....

Pages 15« 1234567 »

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | free samples without surveys