Monday, 18 August 2014

२५. धूप दीप झाला आता कापूर आरती


धूप दीप झाला आता कापूर  आरती  | देवा कापूर आरती  ॥
रत्नजडित सिंहासनी     भगवंता मूर्ती  ॥ धृ ॥

कर्पूरासम निर्मल माझे मानस राहू दे  ॥
देवा मानस राहू दे  ॥
कर्पूरासम भावभक्तीचा     सुगंध वाहू दे  ॥  धूप दीप...

कापुराची लावून ज्योती पाहीन तव मूर्ती  ॥
देवा पाहीन तव मूर्ती  ॥
नयनी साठवू     ही भगवंत मूर्ती  ॥ २ ॥  धूप दीप...

ज्ञान कळेना ध्यान कळेना  |  कळेना काही  ॥
देवा कळेना काही  ॥
शब्दरूपी गुंफूनी माळा   ,  वाहतसे पायी  ॥ ३ ॥ धूप दीप...

नेत्री ध्यान मुखी नाम, हृदयी तव मूर्ती  ॥
देवा हृदयी तव मूर्ती  ॥
भावभक्तीने केली देवा,  कापूर आरती  ॥ ४ ॥  धूप दीप...

 

२४. कापराची ज्योत देवा ओवाळू तुजला


कापराची ज्योत देवा ओवाळू तुजला     ॥
देहंभावे अहंभाव चरणी वाहिला  ॥ धृ ॥

नामस्मरणे मात्र देवा कृपा मज केली     ॥
भक्ता वर द्याया,  मूर्ती प्रसन्न जाहली  ॥ १ ॥
कापराची ज्योत...

दया क्षमा शांती देवा उजळल्या ज्योती     ॥
स्वयंप्रकाशित पाहिली भगवंत मूर्ती  ॥ २ ॥
कापराची ज्योत...

आनंदाने भावे कापूर आरती केली,
हो देवा आरती केली  ॥
नित्यानंदे सगुण स्वामीच्या
परमानंदे सगुण स्वामीच्या
चरणी वाहिली  ॥ ३ ॥
कापराची ज्योत... 

२३. अक्कलकोटनिवासी श्रीस्वामीसमर्था


अक्कलकोटनिवासी श्रीस्वामीसमर्था
जय जय गुरुअवतारा पदीं ठेवी माथा  ॥

नृसिंहसरस्वती अवतारा संपविले
कर्दळीवनात जाऊनि तपाचरण केले
नवरूपां धारण करूनि प्रगट पुन्हा झाले
नाना नामे घेऊनि देशभ्रमण केले  ॥ १ ॥  अक्कलकोट  ॥

योगसिद्धिप्रभावे लीला तू करिसी
धर्मा संरक्षूनि जनांसी उद्धरसी
वाटे ब्रह्म प्रगटले या भूमिवरती  |
दर्शन घेता मिळते चिरसुख मनःशांती  ॥ २ ॥ अक्कलकोट ॥

आर्त भाविक साधक तुजसी शरण येता
मार्गदर्शन करूनि होसी त्या त्राता
सर्वांभूती ईश्वर बघण्या शिकविला
अनन्यभक्तां रक्षिसी आश्‍वासन देता  ॥ ३ ॥

परब्रह्म गुरुदेवा कृपा करी आता
शरण तुजसी आलो तारी अनाथा
भुक्ति-मुक्ति  सद्गती  देई भगवंता
गुरुराया अवधूता अवतारी दत्ता  ॥ ४ ॥

२२. धन्य धन्य हो प्रदक्षिणा


धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची  |
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची  २  ॥ धृ ॥
पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी  |
सर्वही तीर्थे घडली आम्हां आदिकरूनि काशी  ॥
धन्य धन्य हो...

मृदंग टाळ ढोल भक्त भावार्थ गाती  |
नामसंकीर्तनें ब्रह्मानंदे नाचती  ॥ २ ॥
धन्य धन्य हो...

कोटी ब्रह्महत्या हरिती करिता दंडवत  |
लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायांत  ॥ ३ ॥
धन्य धन्य हो...

गुरुभजनाचा महिमा न कळे आगमनिगमांसी  |
अनुभव ते जाणती जे गुरुपदिचे रहिवासी  ॥ ४ ॥
धन्य धन्य हो...

प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिला  |
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला  ॥ ५ ॥
धन्य धन्य हो...

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | free samples without surveys