
कोटयावधी अपराधपतित मी शरण आलो तुला |आई गे सांभाळी गे मला,रेणुके सांभाळी गे मला ॥ धृ ॥तुझी पूजा मी जाणत नाही ,कैसे करू गे याला ॥ १ ॥ आई गे...मंत्र यंत्र ही तंत्र ही नाही ,माहीत नाही गे मला ॥ २ ॥ आई गे...गायनपण ही येतच नाही ,आळवू कैसे तुला ॥ ३ ॥ आई गे...हरि विनवितो तुझिया चरणी,दास विनवितो तुझिया चरणी |करुणा येऊ दे तुला ॥ ४ ॥ आई गे.....