कोटयावधी अपराधपतित मी
शरण आलो तुला |
आई गे सांभाळी गे मला,
रेणुके सांभाळी गे मला ॥ धृ ॥
तुझी पूजा मी जाणत नाही ,
कैसे करू गे याला ॥ १ ॥ आई गे...
मंत्र यंत्र ही तंत्र ही नाही ,
माहीत नाही गे मला ॥ २ ॥ आई गे...
गायनपण ही येतच नाही ,
आळवू कैसे तुला ॥ ३ ॥ आई गे...
हरि विनवितो तुझिया चरणी,
दास विनवितो तुझिया चरणी |
करुणा येऊ दे तुला ॥ ४ ॥ आई गे...
0 comments:
Post a Comment