हेरंब शिवकुलदीपका, तुज आरती गणनायका ॥ धृ ॥
सिंदुरासुर मर्दूनि, सुरा सोडविले त्रासातूनि |
देवगण तुज वंदूनि, स्वस्थानी गेले हर्षूनि ॥ १ ॥
हेरंब...
दर्शने तव श्रीपती, मनःकामना सिद्धीस जाती |
स्वयप्रंकाशित तू गजवदना, निरांजन दीप काय तुला ॥ २ ॥
हेरंब...
मंगलारती गुंफुनि, ही आरती द्वारकासुत गातो |
आरती ओवाळीतो, आरती ओवाळीतो ॥ ३ ॥
हेरंब...
0 comments:
Post a Comment