माते दर्शन मात्रे प्राणी उद्धरिसी |
हरीसी पातक अवघें जग पावन करिसी |
दुष्कर्मी मी रचिल्या पापांच्या राशी |
हर हर आतां स्मरतों गति होईल कैसी ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय गंगामाई |
पावन करिं मज सत्वर विश्वाचे आई ॥ धृ ॥
पडले प्रसंग तैशी कर्में आचरलो |
विषयांचे मोहानें त्यातचि रत झालो |
ज्याचे योगें दुष्कृत सिंधुंत बुडालो |
त्यांतून मजला तारिसी ह्या हेतूने आलो ॥ २ ॥ जय देवी...
निर्दय यमदूत नेती त्या समयी राखी |
क्षाळी यमधर्माच्या खात्यातील बाकी |
सत्संगति जन अवघे तारियलें त्वा की |
उरलों पाहे एकचि मी पतितांपैकी ॥ ३ ॥ जय देवी...
अघहरणे जय करुणे विनवीतसे भावें |
नोपेक्षी मज आतां त्वत्पात्री घ्यावे |
केला पदर पुढें मी मज इतुकें द्यावे |
जीवें त्या विष्णुच्या परमात्मनि व्हावे ॥ ४ ॥
जय देवी…
0 comments:
Post a Comment