Monday, 18 August 2014

२३. अक्कलकोटनिवासी श्रीस्वामीसमर्था


अक्कलकोटनिवासी श्रीस्वामीसमर्था
जय जय गुरुअवतारा पदीं ठेवी माथा  ॥

नृसिंहसरस्वती अवतारा संपविले
कर्दळीवनात जाऊनि तपाचरण केले
नवरूपां धारण करूनि प्रगट पुन्हा झाले
नाना नामे घेऊनि देशभ्रमण केले  ॥ १ ॥  अक्कलकोट  ॥

योगसिद्धिप्रभावे लीला तू करिसी
धर्मा संरक्षूनि जनांसी उद्धरसी
वाटे ब्रह्म प्रगटले या भूमिवरती  |
दर्शन घेता मिळते चिरसुख मनःशांती  ॥ २ ॥ अक्कलकोट ॥

आर्त भाविक साधक तुजसी शरण येता
मार्गदर्शन करूनि होसी त्या त्राता
सर्वांभूती ईश्वर बघण्या शिकविला
अनन्यभक्तां रक्षिसी आश्‍वासन देता  ॥ ३ ॥

परब्रह्म गुरुदेवा कृपा करी आता
शरण तुजसी आलो तारी अनाथा
भुक्ति-मुक्ति  सद्गती  देई भगवंता
गुरुराया अवधूता अवतारी दत्ता  ॥ ४ ॥

0 comments:

Post a Comment

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | free samples without surveys