येई हो विठ्ठले माझे माउलीये ॥
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें ॥ धृ ॥
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ॥
पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ १ ॥
येई हो विठ्ठले...
पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥
गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला ॥ २ ॥
येई हो विठ्ठले...
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ॥
विष्णुदास नामा जीवें भावें ओवाळी ॥ ३ ॥
येई हो विठ्ठले...
असो नसो भाव आम्हां तुझिया ठाया |
कृपादृष्टि पाहे माझ्या पंढरीराया ॥ ४ ॥
येई हो विठ्ठले...
0 comments:
Post a Comment