Tuesday, 12 August 2014

Aniruddha Gurukshetram Ganapati Punarmilap Procession


तिसर्‍या दिवशी पुनर्मिलाप मिरवणूक दुपारी ४-४.३०च्या  सुमारास सुरू होते आणि या सोहळ्यात जणू श्रद्धावान भाविकांचा महासागरच लोटतो. हजारोंच्या संखेने भक्त या सोहळ्यात सहभागी होतात. ’गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात बाप्पा फुलांनी सजवलेल्या वाहनावर विराजमान होतात आणि गणपतिसह अन्य एका वाहनातून भव्य शिवपिण्डीही प्रस्थान करत असते.

गरुडटके नाचवत, लेझिमसह लयबद्ध हालचाली करत आणि भक्तिमय गजरांवर नाचत श्रद्धावान पुनर्मिलाप मिरवणुकीत सहभागी होतात.
स्वत: परमपूज्य बापु, बापुंच्या पत्नी सौ. नन्दाई, सुचितदादा मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्वांचे स्वागत करतात. गणपतीबाप्पासोबत वाहनात असणारे श्रद्धावान शंख आणि घंटा यांचा मंगल नाद अखंडपणे करत असतात. त्याचप्रमाणे येथेही दर्शन घेणार्‍यांना प्रसाद दिला जातो. बापु स्वत: मिरवणुकीत श्रद्धावान मित्रांसह सहभागी होतात आणि बाप्पाच्या मिरवणुकीतील गजरांच्या तालावर प्रेमाने नाचतात. बापुंना भक्तिमय गजरांसह आनंद साजरा करताना पाहून श्रद्धावानही बेभान होऊन भक्तीच्या रंगात नाहत, नाचत आनन्द साजरा करतात. या मिरवणूक पथावर नऊ ठिकाणी श्रद्धावान श्रींचे औक्षण करतात. बापुंच्या घरच्या गणपतीचे औक्षण करण्यास मिळाल्याचा आनन्द या प्रसंगी त्यांच्या चेहर्‍यावरून ओसंडत असतो.

साधारण रात्री साडे नऊच्या सुमारास पुनर्मिलाप सोहळा संपन्न होतो आणि त्यानंतर प्रत्येकाने  हॅपी होम येथे येऊन महाप्रसाद घेऊन जावा याबाबत बापुंचा सप्रेम आग्रह असतो. हसतमुख नन्दाईंकडून प्रसाद स्वीकारताना सर्वांचा शीण कुठल्याकुठे पळून जातो आणि बापु, नन्दाई व सुचितदादांना हरि ॐ म्हणून निघणार्‍या प्रत्येक श्रद्धावान मित्राच्या चेहर्‍यावर अम्बज्ञतेबरोबरच पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाची प्रतीक्षा स्पष्टपणे झळकत असते.

पावित्र्य हेच प्रमाण या बापुंनी घालून दिलेल्या मर्यादेचे पूर्णपणे पालन करून उत्सव कसा भक्तिभावमयपणे आणि प्रचंड उत्साहात साजरा करावा याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हा दर वर्षी साजरा केला जाणारा सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या घरचा  गणेशोत्सव!
 गणपती बाप्पा मोरया!

Ganapati Darshan

 
पहिल्या दिवशी सकाळी ११.०० वाजल्यापासून ते रात्रौ ९.०० वाजेपर्यंत श्रद्धावान गणेशाचे दर्शन घेतात. ऋषिपंचमीच्या दिवशी म्हणजेच श्रीगणेशोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी सकाळी ९.०० वाजल्यापासून ते रात्रौ ७.०० वाजेपर्यंत दर्शनाचा कार्यक्रम असतो, तर तिसर्‍या दिवशी सकाळी ९.०० वाजल्यापासून ते दुपारी १.०० वाजेपर्यंत श्रद्धावान दर्शनाचा लाभ घेऊ शकतात. उत्सवकाळात दिवसभर बापुंच्या घरी देवघरात श्रीदत्तमालामन्त्राचे पठण सुरू असते तर त्याचबरोबर श्रीगुरुक्षेत्रम येथे श्रीगणेश अथर्वशीर्षाचे पठण सुरू असते.

उत्सवकाळात सकाळ-संध्याकाळ गणपतीबाप्पाला बापुंच्या घरी बनवलेला नैवेद्य विधिवत अर्पण केला जातो. उत्सवकाळात केवळ मुंबईतूनच नव्हे तर देशविदेशातून येणार्‍या श्रद्धावानांनी हॅपी होमचा परिसर फुललेला असतो. सकाळपासून ते रात्रीपर्यंत भक्त श्रींचे दर्शन घेत असतात. श्रद्धावान शांतपणे नामस्मरण करत पूर्ण शिस्त पाळून आराध्याचे दर्शन घेतात. श्रद्धावानांना दर्शनाबरोबर प्रसादाचा लाभ मिळतो. तीनही दिवस परमपूज्य बापु, बापुंच्या पत्नी सौ. नन्दाई, सुचितदादा स्वत: जातीने हजर राहून गणेशाच्या दर्शनासाठी आलेल्या श्रद्धावान मित्रांचे स्वागत करतात. हे तिघेही गणेशोत्सवात अथक परिश्रम करणार्‍या कार्यकर्त्यांच्या चहा, नाश्ता, भोजन आदिची व्यवस्था काटेकोरपणे पाहतात, त्यांची आपुलकीने विचारपूस करतात.

Pratishtapana of Lord Ganesha at residence of Aniruddha Bapu




श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच श्रीगणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी ९.०० वाजल्यापासून शास्त्रोक्त विधिवत श्रीगणेशपूजनाचा प्रारंभ होतो आणि यावेळी बापुंसह सर्व कुटुंबीय उपस्थित असतात. गणपतिच्या आजूबाजूला केलेली सजावट हीसुद्धा इको फ्रेंडली असते. श्रद्धावान ह्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण अनिरुद्ध टीव्हीवरुन जगभरातून घरबसल्यादेखील पाहू शकतात.

सकाळी ११.०० वाजल्यापासून ते रात्रौ ९.०० वाजेपर्यंत श्रद्धावान गणेशाचे दर्शन घेतात. रात्रौ ९.०० वाजता महाआरती असते आणि त्या वेळी स्वत: परमपूज्य बापु, बापुंच्या पत्नी सौ. नन्दाई, सुचितदादा सर्वांसह भक्तिभावाने तन्मय होऊन आरतीत सहभागी होतात. आदिमाता चण्डिकेची आरती करताना मातृप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या बापुंना पाहताना श्रद्धावान मन्त्रमुग्ध होतात. महा आरतीनंतर बापु स्वत: कुटुंबीयांसमवेत गणरायासमोर शान्तपणे बसून स्तोत्रपठण, मन्त्रजप, पोथीवाचन करतात.


बापूंच्या घरी ज्या पद्धातीने गणपतीची प्राण प्रतिष्ठापना केली जाते. त्या पूजन विधीची पुस्तिका आंजनेय पब्लिकेशनच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

Ganapati Welcome Procession


गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी श्रीगणेशाच्या आगमनाची मिरवणूक सायंकाळी साधारण ५ वाजता बांद्रा लिंक रोड वरुन सुरू होते. ढोलताशांच्या गजरात निघणारी श्रीगणेशाच्या आगमनाची मिरवणूक ही एक आगळीवेगळी मिरवणूक असते, ज्यात भक्तीचे रंग उधळत श्रद्धावान गणेशाचे स्वागत करतात. अनेक श्रद्धावान भक्त ह्यात सहभागी होतात. श्रद्धावानांच्या लेझिम पथकाचा उत्साह आणि शिस्त यांबरोबर त्या तरुण मंडळींच्या चेहर्‍यावरून ओसंडणारे अनिरुद्धप्रेम आणि भक्तिभाव वाखाणण्याजोगे असतात. त्याचबरोबर पारंपारिक पध्दतीने श्रद्धावान श्रींची दिंडी काढतात.

हॅपी होम येथे स्वत: परमपूज्य बापु, बापुंच्या पत्नी सौ. नन्दाई, सुचितदादा गणपतीच्या स्वागतासाठी सज्ज असतात. गणपतीचे आगमन होताच परमपूज्य नन्दाई गणपती आणि दत्तात्रेयांचे औक्षण करतात. बालगणपती हा त्याच्या आजोळी आलेला आहे या भावाने त्याचे स्वागत नन्दाई करतात आणि त्यावेळी त्यांच्याकडून केले जाणारे बालगणेशाचे औक्षण आणि दृष्ट काढणे हा हदयंगम सोहळा असतो.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | free samples without surveys