Tuesday, 12 August 2014

Ganapati Darshan

 
पहिल्या दिवशी सकाळी ११.०० वाजल्यापासून ते रात्रौ ९.०० वाजेपर्यंत श्रद्धावान गणेशाचे दर्शन घेतात. ऋषिपंचमीच्या दिवशी म्हणजेच श्रीगणेशोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी सकाळी ९.०० वाजल्यापासून ते रात्रौ ७.०० वाजेपर्यंत दर्शनाचा कार्यक्रम असतो, तर तिसर्‍या दिवशी सकाळी ९.०० वाजल्यापासून ते दुपारी १.०० वाजेपर्यंत श्रद्धावान दर्शनाचा लाभ घेऊ शकतात. उत्सवकाळात दिवसभर बापुंच्या घरी देवघरात श्रीदत्तमालामन्त्राचे पठण सुरू असते तर त्याचबरोबर श्रीगुरुक्षेत्रम येथे श्रीगणेश अथर्वशीर्षाचे पठण सुरू असते.

उत्सवकाळात सकाळ-संध्याकाळ गणपतीबाप्पाला बापुंच्या घरी बनवलेला नैवेद्य विधिवत अर्पण केला जातो. उत्सवकाळात केवळ मुंबईतूनच नव्हे तर देशविदेशातून येणार्‍या श्रद्धावानांनी हॅपी होमचा परिसर फुललेला असतो. सकाळपासून ते रात्रीपर्यंत भक्त श्रींचे दर्शन घेत असतात. श्रद्धावान शांतपणे नामस्मरण करत पूर्ण शिस्त पाळून आराध्याचे दर्शन घेतात. श्रद्धावानांना दर्शनाबरोबर प्रसादाचा लाभ मिळतो. तीनही दिवस परमपूज्य बापु, बापुंच्या पत्नी सौ. नन्दाई, सुचितदादा स्वत: जातीने हजर राहून गणेशाच्या दर्शनासाठी आलेल्या श्रद्धावान मित्रांचे स्वागत करतात. हे तिघेही गणेशोत्सवात अथक परिश्रम करणार्‍या कार्यकर्त्यांच्या चहा, नाश्ता, भोजन आदिची व्यवस्था काटेकोरपणे पाहतात, त्यांची आपुलकीने विचारपूस करतात.

0 comments:

Post a Comment

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | free samples without surveys