Tuesday, 12 August 2014

Ganapati Welcome Procession


गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी श्रीगणेशाच्या आगमनाची मिरवणूक सायंकाळी साधारण ५ वाजता बांद्रा लिंक रोड वरुन सुरू होते. ढोलताशांच्या गजरात निघणारी श्रीगणेशाच्या आगमनाची मिरवणूक ही एक आगळीवेगळी मिरवणूक असते, ज्यात भक्तीचे रंग उधळत श्रद्धावान गणेशाचे स्वागत करतात. अनेक श्रद्धावान भक्त ह्यात सहभागी होतात. श्रद्धावानांच्या लेझिम पथकाचा उत्साह आणि शिस्त यांबरोबर त्या तरुण मंडळींच्या चेहर्‍यावरून ओसंडणारे अनिरुद्धप्रेम आणि भक्तिभाव वाखाणण्याजोगे असतात. त्याचबरोबर पारंपारिक पध्दतीने श्रद्धावान श्रींची दिंडी काढतात.

हॅपी होम येथे स्वत: परमपूज्य बापु, बापुंच्या पत्नी सौ. नन्दाई, सुचितदादा गणपतीच्या स्वागतासाठी सज्ज असतात. गणपतीचे आगमन होताच परमपूज्य नन्दाई गणपती आणि दत्तात्रेयांचे औक्षण करतात. बालगणपती हा त्याच्या आजोळी आलेला आहे या भावाने त्याचे स्वागत नन्दाई करतात आणि त्यावेळी त्यांच्याकडून केले जाणारे बालगणेशाचे औक्षण आणि दृष्ट काढणे हा हदयंगम सोहळा असतो.

0 comments:

Post a Comment

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | free samples without surveys