Monday, 18 August 2014

१२. धरियेले गे माय श्रीदत्तगुरुंचे पाय
 धरियेले गे माय श्रीदत्तगुरुंचे पाय
माये दत्तगुरुंचे पाय  |
अनसूये सांग तुजविण कोण करी उपाय  धृ  

दत्तगुरुंची आज्ञा हेचि तुझे मूळ रूप
माये तुझे मूळ रूप  |
महाविष्णुसी सांभाळिसी तू मांडीवर घेऊन 
धरियेले गे माय....

लक्ष्मी पार्वती सरस्वतीसी देसी आश्रय
माये देसी आश्रय  |
त्यांचे पति देऊनि करिसी प्रपंच प्रतिपाळ 
धरियेले गे माय....

वनवासासी निघता जानकी चूडामणि दिधला
माये चूडामणि दिधला  |
हनुमंताच्या हातूनि पुन्हा रामा पावला 
धरियेले गे माय.... 

जय माते जय त्राते भरवी घास गे मजला
माये घास गे मजला  |
आरती करितो अनिरुद्ध हा तुझा तान्हुला 
धरियेले गे माय....

0 comments:

Post a Comment

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | free samples without surveys