Sunday, 17 August 2014

१०. युगे अठ्ठावीस

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा  |

वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा 

पुंडलिकाचे भेटि परब्रह्म आले गा 

चरणी वाहे भीमा उद्धारी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा,  हो हरि पांडुरंगा 

रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा  धृतुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं |

कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी 

देव सुरवर नित्य येती भेटी 

गरुड हनुमंत पुढे उभे राहती    जय...धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा 

सुवर्णाची कमळे वनमाळा गळां 

राई रखुमाबाई राणीया सकळा 

ओवाळीती राजा विठोबा सावळा    जय...ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती  |

चंद्रभागेमाजी सोडुनिया देती 

दिंड्या पताका वैष्णव नाचती 

पढंरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा किती 

जय...

आषाढी कार्तिकी भक्तजन येती,  हो साधुजन येती  ॥
चंद्रभागेमाजीं स्नानें जे करिती  ॥
दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ती  ॥
केशवासी नामदेव, माधवासी नामदेव
भावें ओंवाळिती  ॥ ५ ॥  जय...

0 comments:

Post a Comment

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | free samples without surveys