Moolarka Ganesh at Shree Aniruddha Gurukshetram
गणपतीच्या नामकरणाच्या वेळेस आदिमातेने
‘महिषासुरमर्दिनी’ स्वरूप धारण करून त्या गणपतीस आपल्या मधुपात्रातील मध
चाखविले व त्याला ‘मूलार्क’ असे नाम देऊन त्या नामाचा स्वमुखाने जयजयकार
केला.
श्रद्धावानांच्या देहातील मूलाधार चक्राची स्थूल आणि सूक्ष्म अशा
दोनही स्तरांवर काळजी घेणार्या मूलार्क गणेशाबद्दल पुढील माहिती मिळते -
प्राचीन ‘श्वेतमांदार’ वृक्षाच्या मुळातून उत्पन्न होणारा, ब्रह्मणस्पति
(सूक्ष्म स्तरावर कार्य करणारा किरातरुद्र-शिवगंगागौरीपुत्र) व गणपति
(स्थूल स्तरावर कार्य करणारा परमशिव-पार्वतीपुत्र) यांचे एकत्रित कार्य
श्रद्धावानाला भक्तीतून पुरविणारा असा हा ‘मूलार्कगणेश’ आणि त्याच्या
प्रतिमा श्रद्धावानांच्या मूलाधारचक्राची स्थूल व सूक्ष्म अशा दोन्ही
स्तरांची पूर्णपणे काळजी घेतात.
Photos of Lord Moolarka Ganesha Sthapana Utsav at Shree Aniruddha Gurukshetram
0 comments:
Post a Comment