Tuesday, 26 August 2014

Invitation for Ganapati Festival from Sadguru Aniruddha Bapu


परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी दि. २१-०८-२०१४ रोजीच्या प्रवचनात त्यांच्या सर्व श्रद्धावान मित्रांना गणेशोत्सवाचे निमन्त्रण दिले. गुरुवार दि. २८-०८-२०१४ रोजी संध्याकाळी गणपतीचे आगमन होईल आणि पुनर्मिलाप सोहळा रविवार दि. ३१-०८-२०१४ रोजी संपन्न होईल. सद्गुरु श्री अनिरुद्धांनी दिलेले आमन्त्रण आपण या व्हिडियोत पाहू शकता.
Original at: http://aniruddhafriend-samirsinh.com/invitation-for-ganapati-festival


Friday, 22 August 2014

बापूंच्या घरचा गणपती


ॐ गं गणपतये नम:।
भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथिपासून भाविक वैयक्तिक आणि सामूहिक स्वरूपात गणेशोत्सव साजरा करतात. दीड दिवस ते दहा दिवसांपर्यंत (अनंत चतुर्दशीपर्यंत) हा उत्सव साजरा केला जातो. सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या घरी हॅपी होम, खार येथे पवित्र भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहाने गणोशोत्सव साजरा केला जातो.

श्रीगणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच हरतालिकेच्या दिवशी गणपतीचे आगमन होते. गणपतिची उत्सवमूर्ती ही बालगणेशाची असून पाठीशी अनसूयानन्दन दत्तात्रेयांची सुहास्यवदन मूर्ती असते. ह्या दोन्ही मूर्ती पर्यावरण पूरक (इको फ्रेंडली) असतात. सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार गेली अनेक वर्षे कार्यकर्ते रामनामवहीच्या कागदाच्या लगद्यापासून मोठ्या प्रमाणावर इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवून आपली सेवा श्रीचरणी रुजू करत आहेत.

 पूज्य सूचितदादांच्या मार्गदर्शनानुसार श्रद्धावान या उत्सवाची तयारी काही महिने आधीपासूनच करतात. पूर्वनियोजनामुळे श्रीगणेशाच्या आगमनापासून ते पुनर्मिलपापर्यंतचा सर्व कार्यक्रम व्यवस्थितपणे संपन्न होतो.

बापुंच्या घरच्या गणेशोत्सवात सामील होण्याची, गणपतीचे दर्शन घेण्याची प्रत्येक श्रद्धावानाची उत्कट इच्छा असते. अनेकांच्या घरी किंवा गावाला गणेशोत्सव साजरा केला जातो आणि त्यामुळे बापुंच्या घरच्या दीड दिवसाच्या गणेशोत्सवात सामील होणे सर्वांनाच शक्य होत नसे. श्रद्धावानांच्या प्रेमळ आग्रहाखातर बापुंच्या घरी साजरा केला जाणारा गणेशोत्सव गेल्या काही वर्षांपासून दीड दिवसाऐवजी अडीच दिवसांपर्यंत साजरा केला जाऊ लागला.

Wednesday, 20 August 2014

Shree Aniruddha Gurukshetram Ganeshotsav Punarmilap 2013

Gurukshetram Ganeshotsav 2013 Punarmilap Mirvanuk Moments
Ganesh Utsav, Ganpati Mirvanuk, Punarmilap Mirvanuk, Ganpati Bappa Morya, AniruddhaBapu-Ganeshotsav
Gurukshetram Ganeshotsav 2013 - Punarmilap Mirvanuk

Tuesday, 19 August 2014

Ganapati Darshan Photos 2013

Shraddhavaan bhakta Taking darshan of Aniruddha Bapu's Ganapati at his home

 

Monday, 18 August 2014

२६. घालीन लोटांगण


घालीन लोटांगण,  वंदीन चरण,
डोळ्यांनी पाहीन रूप तुझें  ॥
प्रेमे  आलिंगिन,  आनंदे पूजिन,
भावें ओंवाळिन नामा  ॥ १ ॥

त्वमेव माता च पिता त्वमेव,
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव  |
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव,
त्वमेव सर्वं मम देव देव  ॥ २ ॥

कायेन वाचा मनसैन्द्रियैर्वा,
बुद्ध्याऽऽत्मना वा प्रकृतिस्वभावत्  |
करोमि यद्यत् सकलं परस्मै,
नारायणायेति समर्पयामि  ॥ ३ ॥

अच्युतं केशवं रामनारायणं,
कृष्णदामोदरं वासुदेवं हरीम्  |
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं,
जानकीनायकं रामचन्द्रं भजे  ॥ ४ ॥

॥  हरे राम हरे राम राम राम हरे हरे  |
॥  हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हर  ॥ ५ ॥

२५. धूप दीप झाला आता कापूर आरती


धूप दीप झाला आता कापूर  आरती  | देवा कापूर आरती  ॥
रत्नजडित सिंहासनी     भगवंता मूर्ती  ॥ धृ ॥

कर्पूरासम निर्मल माझे मानस राहू दे  ॥
देवा मानस राहू दे  ॥
कर्पूरासम भावभक्तीचा     सुगंध वाहू दे  ॥  धूप दीप...

कापुराची लावून ज्योती पाहीन तव मूर्ती  ॥
देवा पाहीन तव मूर्ती  ॥
नयनी साठवू     ही भगवंत मूर्ती  ॥ २ ॥  धूप दीप...

ज्ञान कळेना ध्यान कळेना  |  कळेना काही  ॥
देवा कळेना काही  ॥
शब्दरूपी गुंफूनी माळा   ,  वाहतसे पायी  ॥ ३ ॥ धूप दीप...

नेत्री ध्यान मुखी नाम, हृदयी तव मूर्ती  ॥
देवा हृदयी तव मूर्ती  ॥
भावभक्तीने केली देवा,  कापूर आरती  ॥ ४ ॥  धूप दीप...

 

२४. कापराची ज्योत देवा ओवाळू तुजला


कापराची ज्योत देवा ओवाळू तुजला     ॥
देहंभावे अहंभाव चरणी वाहिला  ॥ धृ ॥

नामस्मरणे मात्र देवा कृपा मज केली     ॥
भक्ता वर द्याया,  मूर्ती प्रसन्न जाहली  ॥ १ ॥
कापराची ज्योत...

दया क्षमा शांती देवा उजळल्या ज्योती     ॥
स्वयंप्रकाशित पाहिली भगवंत मूर्ती  ॥ २ ॥
कापराची ज्योत...

आनंदाने भावे कापूर आरती केली,
हो देवा आरती केली  ॥
नित्यानंदे सगुण स्वामीच्या
परमानंदे सगुण स्वामीच्या
चरणी वाहिली  ॥ ३ ॥
कापराची ज्योत... 

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | free samples without surveys